सोने-चांदी महाग की स्वस्त? जाणून घ्या आजचे जळगावातील दर

मे 12, 2021 8:40 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । जळगावच्या सुवर्णबाजारात मागील गेल्या तीन दिवसापासून सोन्याचा भाव स्थिर आहे. आज बुधवारी देखील सोन्याच्या भावात कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाहीय. परंतु चांदीच्या भावात आज १०० रुपयांनी वाढ झालेली आहे.

gold rate 2

सोन्याचा भाव

२४ कॅरेट १ ग्राम सोन्याचा भाव  ४,८०२ रुपये झाला आहे. सोन्याचा १० ग्रामचा दर ४८,०२० रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्राम भाव ४,५७३ रुपये इतका आहे. तर १० ग्रामसाठी तुम्हाला ४५,७३० रुपये मोजावे लागतील.

चांदीचा भाव  

आज चांदीच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली असून १ ग्राम चांदीचा भाव आज ७१. ०६ रुपये इतका असून १ किलोचा दर ७१,६०० रुपये इतका आहे.

दरम्यान, हिंदू धर्मानुसार अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणे शुभ मानलं जातं. यावेळी हा उत्सव 14 मे रोजी आहे. तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now