जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२५ । मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड सुरू असून दुसरीकडे सोन्याच्या दरात प्रचंड मोठी तेजी दिसून आली. यामुळे सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झालीय. एकीकडे लग्नसराईचे दिवस सुरु असताना त्यातच सोन्याच्या दर विक्रमी पातळीवर गेल्यानं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. पण आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण, सोन्याच्या दरात सुरू असलेल्या तेजीला आता ब्रेक लागला आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज २६ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,79,700 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,065 रुपयांना विकलं जात आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,650 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,970 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,376 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,797 रुपयांनी विकलं जात आहे.