जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । सोने चांदी दरात चढ उतार सुरूच असून गेल्या आठवड्यात विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या सोने दरात आता घसरण दिसून आलीय. मागच्या चार दिवसात सोने दरात प्रति तोळा २००० रुपयांची घसरण झालेली आहे.दरम्यान आजदेखील या दरात घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे ५० रुपयांची घसरण झाली असून यामुळे आता १० ग्रॅम सोन्याचा दर प्रति तोळा १,०१,३५० रुपये आहेत.

भारतात पारंपारिकपणे गुंतवणूक आणि दागिने म्हणून सोने आणि चांदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सणासुदीच्या काळात सोने चांदीला मोठी मागणी असते. अनेक जण सोने खरेदी करतात. मात्र गेल्या काही काळात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. काही काळापूर्वी सोन्याची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा कमी होती. मात्र आज सोन्याचा भाव हा एक लाखांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात सोने दराने नवीन उच्चांक गाठला होता. ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर सोने महागल्याने ग्राहकांना मोठी झळ सोसावी लागली. मात्र रक्षाबंधनानंतर सोन्याला उतरती कळा लागली आहे. सलग तीन दिवस ही घसरण होत आहे. आज सोन्याचे दर घसरले आहेत. १८,२२ आणि २४ कॅरेटच्या दरात घसरण झाली आहे. प्रति तोळ्यामागे ५० रुपये तर १० तोळ्यामागे ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर कमी झाले तर लगेच सोने खरेदी करा. हीच उत्तम संधी आहे.
सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,३५० रुपये आहेत. या दरात ५० रुपयांची घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे र ८१,०८० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोनं
२२ कॅरेट सोन्याचे दरदेखील घसरले आहे. २४ कॅरेटप्रमाणेच या दरात ५० रुपयांची घसरण झाली आहे. आज १० ग्रॅम सोन्याची किंमत ९२,९०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७४,३२० रुपये आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. १० ग्रॅम सोन्याचे दर ४० रुपयांनी घसरले आहेच. हे दर ७६,०१० रुपये आहेत.










