⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खुल्या राज्यस्तरीय रायफल स्पर्धेत मुजे’च्या’ दोन खेळाडूंना सुवर्णपदक

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२२ । भिष्मराज बाम शूटिंग अकॅडमी नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या XL क्लब राज्यस्तरीय खुल्या रायफल पिस्तोल शूटिंग स्पर्धेत केसीई सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल, जळगांव येथील एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मूळजी जेठा महाविद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी सुवर्णपदक प्राप्त केले.

सदर स्पर्धेत महिलांच्या गटात १० मीटर ओपन साईट एअर रायफल गटात हर्षाली राजन पाहुजा हिने ४०० पैकी ३२२ गुण मिळवीत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तसेच १० मीटर एअर पिस्तोल गटात प्राजक्ता संजय माळी हिने सुद्धा उत्तम खेळाचे प्रदर्शन करून ४०० पैकी ३५७ गुण मिळवीत सुवर्णपदक पटकाविले.
खेळाडूंना एकलव्य क्रीडा संकुलाचे संचालक व मुळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य प्रशिक्षक किरण पाटील व सहाय्यक प्रशिक्षक सागर सोनवणे यांनी प्रशिक्षण दिले.
खेळाडूंच्या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. स. ना. भारंबे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, एकलव्य रायफल व पिस्तोल शूटिंग अकॅडमी चे प्रशिक्षक किरण पाटील व सहाय्यक प्रशिक्षक सागर सोनवणे यांनी अभिनंदन केले