‘द नेक्स्ट बिलियन’ स्पर्धेत २ हजार रुपयांचे पारितोषिक; युवा नवोन्मेषकांच्या कल्पनांना मिळाले व्यासपीठ

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या टीम अॅपेक्सइनोव्हेटर्स’ने ‘द नेक्स्ट बिलियन — बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’मध्ये तृतीय क्रमांक पटकावत २ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.

युवायव्होल्यूशन युवा संमेलन, युवा भारत: वारशापासून नेतृत्वापर्यंत’ या उपक्रमांतर्गत ६ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. युवा नवोन्मेषक आणि उद्योजकांना आपल्या कल्पना मांडण्याची, व्यावसायिक कौशल्य प्रदर्शित करण्याची तसेच समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणार्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची संधी या स्पर्धेत मिळाली.
‘टीम अॅपेक्सइनोव्हेटर्स’मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील प्रतीक वारके, शेख अल्तमाश, गौरव इंगळे आणि जिज्ञासा पाटील यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे आपली व्यावसायिक संकल्पना सादर करत नाविन्यपूर्ण विचार, टीमवर्क, उद्योजकीय दृष्टिकोन आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडविले.या यशाबद्दल गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक तसेच नवोपक्रम आणि उद्योजकता क्षेत्रातील उपक्रमांना आणखी बळ मिळाले आहे.







