गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरले

सप्टेंबर 30, 2021 12:50 PM
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ ।जिल्ह्यासाठी वरदान ठरत असलेले गिरणा धरण सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के भरले आहे. धरणाचे ४ दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले असून सध्या ७५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे उपविभागीय अभियंता हेमंत पाटील यांनी सांगीतले आहे.

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर काही धरण फुल भरून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काल रात्रीच गिरणा धरणात ९९ टक्के जलसाठा झाला होता. तर आज सकाळी धरण पूर्णपणे भरले असून यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

girna dam 1

दरम्यान, गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने खालील बाजूला असलेल्या गावांमध्ये प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. तसेच गुरांना नदीपात्रात उतारू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे. गिरणा धरण पूर्ण भरण्याची यंदा हॅटट्रीक झाली आहे. तर, धरण बांधल्यापासून ते फुल्ल भरल्याची यंदाची अकरावी वेळ आहे. अर्थात हे धरण पहिल्यांदाच लागोपाठ तिसर्‍या वर्षी पूर्ण भरले आहे. यामुळे यावर अवलंबून असणार्‍या नागरिकांसह शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now