⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जामनेर ‘विकासो’त गिरीश महाजनांचे पॅनल विजयी

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । जामनेर विविध कार्यकारी सोसायटीत आमदार गिरीश महाजन व माजी खासदार ईश्वरलाल जैन प्रणित सहकार पॅनलच्या सर्व १३ जागांवरील उमेदवारांचा सरासरी शंभरावर मतांनी विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या एका गटाच्या शेतकरी पॅनलचा सफाया झाला आहे.

अधिक माहिती अधिक कि, जामनेर विकासो निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे छगन झाल्टे, श्रीराम महाजन, काँग्रेसचे पारस ललवाणी, खासदार ईश्वरलाल जैन समर्थक राजू बोहरा यांनी आमदार गिरीश महाजन यांच्याकडे प्रस्ताव ठेवला हाेता. मतांची बेरीज पाहता भाजप प्रणित पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील, हे स्पष्ट असतानाही केवळ निवडणूक नको म्हणून आमदार गिरीश महाजन यांनीही त्यास सहमती दर्शवली. वाटाघाटीत कोणत्या व किती जागा कुणी घ्याव्यात येथपर्यंत चर्चा झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष एस. टी. पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १७ रोजी मतदान होऊन मतमोजणी झाली असता आमदार गिरीश महाजन व ईश्वरलाल जैन प्रणित सहकार पॅनलच्या सर्व १३ जागांवरील उमेदवार शंभरपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजयी झाले.

सर्वसाधारण मतदार संघातून शंकर राजपूत (३३२), राजेंद्र भोईटे (३२६), प्रदीप गायके (३२२), पांडुरंग माळी (३२०), देवराम चौधरी (३१४), विजय सोनवणे (३१०), ज्ञानेश्वर माळी (३०८), अ. जावेद अ. वाहेद (२८२) तर महिला राखीव मतदार संघातून माधुरी दिनेश लखोटे (३४०) व डॉ. स्नेहांकिता जगन्नाथ लोखंडे (३२८), भटक्या विमुक्त मतदार संघातून गोविंदा विष्णू धनगर (३४२) यांचा विजय झाला. तर गोपाल पाटील व जगन सुरळकर हे बिनविरोध विजयी झाले होते.
निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर गुलालाची उधळण करत जल्लाेष साजरा करताना सहकार पॅनलचे समर्थक.