---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

भाजप आमदार मंगेश चव्हाणांना गोळ्या घालण्याची धमकी ; गिरीश महाजन म्हणतात..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. अशातच आता या धमकी प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

GIRISH MAHAJAN 3 jpg webp

काय म्हणाले गिरीश महाजन?
ते म्हणाले की, मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आमदारांना भर रस्त्यात गोळ्या घालून मारून टाकेल यापेक्षा गंभीर घटना कोणती असू शकत नाही. त्या व्यक्तीवर आता कठोर कारवाई झाली पाहिजे. व्यासपीठावर बसून अशा स्वरूपाची धमकी देणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. मंगेश चव्हाण हे सध्या माझ्यासोबत असून या संदर्भात तक्रार देणार आहे.

---Advertisement---

मी या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकार
महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी व्यासपीठावर भाषण केले. त्यावेळी व्यासपीठावर माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते. त्या व्हिडिओमध्ये माजी सरपंच किसनराव जोर्वेकर म्हणतात, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे, त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. शपथ घेऊन सांगतो मी तुला संपवून टाकेल, माझे वय 73 आहे. मला कॅन्सर, मधुमेह आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन. मला जास्त जगायचे नाही. मला काहीच फरक पडत नाही.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---