⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | बातम्या | बाबो..! लालबागच्या राजाला अनंत अंबानींकडून ‘इतक्या’ किलो सोन्याचा मुकुट दान, किंमत जाणून घ्या..

बाबो..! लालबागच्या राजाला अनंत अंबानींकडून ‘इतक्या’ किलो सोन्याचा मुकुट दान, किंमत जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ संप्टेंबर २०२४ । बहुप्रतिक्षित ‘लालबाग चा राजा’ची पहिली झलक काल गुरुवारी संध्याकाळी पाहायला मिळाली. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी यांनी ‘लालबाग चा राजा’ला मुकुट दान केला. या मुकुटाची खूप चर्चा होत आहे कारण तो बनवण्यासाठी 20 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. सोन्याच्या मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘लालबाग चा राजा’च्या पुतळ्याचे गुरुवारी अनावरण झाल्यानंतर ‘लालबाग चा राजा’ला 20 किलो सोन्याचा मुकुट घातला गेला. हा मुकुट अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनने दान केला होता. अनंत अंबानी आणि संपूर्ण अंबानी कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून ‘लालबाग चा राजा’ मंडळाशी जोडले गेले आहे आणि ते लालबागच्या राजाच्या विसर्जन यात्रेतही सहभागी होतात.

‘अंबानी कुटुंबाची भक्ती पाहून अभिमान वाटतो’
‘लालबाग चा राजा’ मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले की, काल अंबानी कुटुंबाकडून 20 किलो सोन्याचा मुकुट दान म्हणून आणण्यात आला आहे. पहिल्या दर्शनानंतर राजाला हा मुकुट देण्यात आला. अंबानी कुटुंब मंडळाशी प्रदीर्घ काळापासून जोडले गेले आहे आणि त्यांची गणपती बाप्पावरील भक्ती पाहून आम्हाला अभिमान वाटतो. ते अनेकदा या उत्सवात सहभागी होतात.

अंबानी कुटुंब अतिशय धार्मिक
अनंत यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जागतिक दर्जाचे व्यापारी कुटुंब असूनही ते सर्व अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक आहेत आणि सनातन धर्मावर विश्वास ठेवतात. अनंत म्हणाला, ‘माझा भाऊ शिवभक्त आहे. माझे वडील गणेशाची पूजा करतात. माझी आई नवरात्रीत नऊ दिवस उपवास करते. माझी आजी देखील श्रीनाथजींची भक्त आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण देवाचा भक्त आहे. आपल्याकडे जे काही आहे ते त्याने दिले आहे. देव सर्वत्र आहे, तुमच्यात आणि माझ्यात आहे, असा आमचा विश्वास आहे. माझे संपूर्ण कुटुंब सनातन धर्मावर विश्वास ठेवते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.