---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील ८४,४५४ घरकुल लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता व मंजुरी पत्र

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत जळगाव जिल्ह्याकरिता मंजूर ८९,८६८ उद्दिष्टांपैकी ८४,४५४ लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण व घरकुल मंजुरी पत्र वितरण कार्यक्रम उद्या शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

home jpg webp

राज्यस्तरावर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

---Advertisement---

जळगाव जिल्ह्यातील ८४,४५४ लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरी पत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे राज्यभरातील लाभार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील पहूर पेठ, देवगाव, साकरी, पाळधी, हातेड, दहिवद या ग्रामपंचायतींच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी केले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---