जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना मिळणार लगेचच शीट ; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा..

जुलै 31, 2025 2:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२५ । भारतीय रेल्वेनं दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात असून यामुळे अनेकवेळा कन्फॉर्म शीट मिळेल कठीण होते. अशावेळी कधी कधी जनरल डब्यातून प्रवास करावा लागतो. मात्र जनरल डबे नेहमीच प्रवाशांनी भरलेले असतात, त्यामुळे जागा मिळणे खूप कठीण असते. सणासुदीच्या काळात तर जनरल डब्ब्यात पाय ठेवायला जागा नसते. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय सहन करत प्रवास करावा लागतो.

railway train

मात्र आता सरकारने जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. तो म्हणजे पुढील 5 वर्षांत 17,000 बिगर वातानुकूलित जनरल/स्लीपर कोच डब्बे तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली.यामुळे जनरल डब्यात आता लगेच सीट मिळणार.

सर्वसामान्यांना लक्षात घेऊन गाड्यांमध्ये नॉन-एसी कोचची संख्या वाढवण्यात आली आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले की, भारतीय रेल्वे चालवणाऱ्या गाड्यांमध्ये नॉन-एसी कोचची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे आणि ती सुमारे ७० टक्के झाली आहे. पुढील ५ वर्षांत अतिरिक्त १७,००० नॉन-एसी जनरल आणि स्लीपर कोच तयार करण्यासाठी एक विशेष उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

भारतीय रेल्वेने सामान्य वर्गात प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये, विविध लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये १,२५० जनरल कोच वापरण्यात आले आहेत. भारतीय रेल्वे गरीब आणि कनिष्ठ मध्यम वर्गासह सामान्य जनतेच्या हितासाठी मेल, एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांसह परवडणाऱ्या भाडे रचनेसह मोठ्या संख्येने गाड्या चालवत आहे.

जनरल आणि बिगर वातानुकूलित स्लीपर डब्यांमधून‌ प्रवास करणाऱ्या अधिक प्रवाशांना सामावून घेण्याच्या दृष्टीने 22 मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या रचनेबाबतच्या विद्यमान धोरणात 22 डब्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये 12 (बारा) जनरल वर्गाचे आणि स्लीपर क्लास बिगर वातानुकूलित डबे आणि 08 (आठ) वातानुकूलित डब्यांची तरतूद आहे.

याशिवाय, अनारक्षित प्रवाशांच्या गरजा पूर्ण करत भारतीय रेल्वे परवडणाऱ्या प्रवासासाठी अनारक्षित बिगर वातानुकुलीत पॅसेंजर ट्रेन/मेमू/ईएमयू इत्यादी चालवते, ज्या मेल/एक्सप्रेस सेवांमध्ये उपलब्ध असलेल्या अनारक्षित व्यवस्थे (डबे) व्यतिरिक्त असतात. अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांचा विकास, मेमू गाड्यांचे उत्पादन आणि जनरल डब्यांचा हिस्सा वाढवणे यावरून स्पष्ट होते की भारतीय रेल्वे जनरल वर्गातील प्रवासाची मागणी प्रभावीपणे पूर्ण करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now