Jalgaon : गोमांसच्या संशयावरून वाहन तपासणाऱ्या गोसेवकांवर हल्ला ; दोघे गंभीर, ६ जणांवर गुन्हे दाखल

जून 20, 2026 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहन तपासणी करणाऱ्या गोसेवकांवर १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना१८ जून रोजी जळगावातील शिवाजीनगर परिसरातील उस्मानिया पार्क येथे हा प्रकार घडला. या बेदम मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, जखमी गोसेवक योगेश गोपाळ साळी हे आपल्या मित्रांसह कानळदा रोड परिसरात असताना त्यांना एक मालवाहू वाहन (एमएच-०४ एचडी-७५२९) संशयास्पद अवस्थेत दिसले. वाहनातून दुर्गंधी येत असल्याने योगेश व त्यांच्या मित्रांनी चालकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडीजवळ उभ्या असलेल्या समशेर खान नावाच्या चालकाने वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी समशेर याने कॉलनीतून १०-१५ जणांना फोन करून बोलावले. त्यांनतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हाणामारी झाली. यावेळी समशेर खानच्या भावाने राहुल सोनवणेच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली असता त्याचे डोक्यातून रक्तश्राव झाल्याने तो खाली पडला. राहुल याला वाचविण्यासाठी गेलेल्या योगेश साळी याला सुद्धा समशेर खान, त्याचा भाऊ व समशेर खानचे दोन मुले यांनी जबर मारहान करत गंभीर जखमी केले

दरम्यान, राहुल सोनवणेवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहे तर योगेशला बेदम मारहाण झाल्याने त्याच्यावरही जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत योगेश साळीच्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now