⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

फैजपूर येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गीतरामायणाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । श्रीराम जन्मोत्सवानिमित्त १० एप्रिल रोजी फैजपूर येथील बाहेर पेठमधील श्रीराम मंदिरात गीत रामायणाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम मंदिरात सकाळी ७.३० ते १० वाजेदरम्यान होईल. गीतरामायण नंतर पूजा व दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव होईल.

गावातील खुशाल भाऊ रोडवरील श्रीराम मंदिरात सकाळी ९ ते ११ दरम्यान योगेश महाराज यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व प्रसादाचा कार्यक्रम राहील. रात्री ७ ते १० वाजेदरम्यान ग.दी.माडगुळकर लिखित व सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातील गायलेल्या गीतरामायणाचा कार्यक्रम मंदिराच्या हॉलमध्ये होणार आहे. सदरचा गीत गायनाचा कार्यक्रम सुरेश बी. महाजन, लक्ष्मीनगर फैजपूर व त्यांचे सहकारी सादर करतील. दोन्ही राम मंदिरातील या कार्यक्रमांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व पी.व्ही.चौधरी, विश्वस्त मंडळाने केले आहे.