⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

नोकरीचा गोल्डन चान्स.. राज्यातील पोलीस दलात 12वी पाससाठी मोठी पदभरती

पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. गडचिरोली पोलीस विभाग (Gadchiroli District Police bharti 2022) मध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Gadchiroli Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : 136

पदाचे नाव : पोलीस शिपाई (Police Constable)

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे(ST) चे उमेदवार किवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या किवा जखमी झालेल्या पोलीस बातमीदार किवा पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेल्या उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत,ते भरती करिता पात्र ठरतील. व उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही.

अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग: 450 /- रुपये
मागास प्रवर्ग: 350 /- रुपये

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.

र्ज करण्यासाठीची शेवटची तारीख : 05 जून 2022

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा