जळगाव शहर

जी.एच. रायसोनी महाविद्यालयातर्फे स्वागत व निरोप समारंभ संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । जी.एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेट महाविद्यालयातील एमबीए, एमसीए, बीबीए, बीसीएच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांच्यासाठी सांस्कुतिक कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले तर महाविद्यालयाकडून याच विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देऊन पूढच्या वाटचाली करीता त्यांना शूभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना संचालिका यांनी नमूद केले कि, जर तुम्ही पूर्ण झोकून देऊन मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, तूम्ही जे काही काम करत आहात त्यात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक नसाल तर तुम्हाला यश कधीच मिळू शकत नाही. तुमचा प्रामाणिकपणाच तुम्हाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाईल. संकटांना न घाबरता मोठी स्वप्न बघा.आणि ती पूर्ण करण्याचा ध्यास घ्या.सतत कामात व्यस्त राहणारी माणसचं काहीतरी करुन दाखवितात. कोणत्याही कामाचा दर्जा ठेवा. दर्जेदार व प्रामाणिक, सचोटीने काम करा. यश तुम्हाला शोधत येईल. तसेच आजच्या बदलत्या ओद्योगीक जगाचा आढावा घेत प्रत्येक व्यवसायात टेक्नोलॉजीला किती महत्व आले आहे यांचे विविध उदाहरणं देत त्यांनी स्पष्ट केले तसेच आजच्या प्रत्येक व्यवसायात जर ठीकून राहायचे असेल तर टेक्नोलॉजीशिवाय पर्याय नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्ष रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल हे होते. तर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ राजकुमार कांकरिया, एमसीए विभागप्रमुख प्रा.रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे व बीबीए विभागप्रमुख योगिता पाटील या व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ राजकुमार कांकरिया यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी व समन्वयक म्हणून प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. विनोद महाजन, प्रा. प्रतीक्षा जैन यांनी पार पाडली. यावेळी विविध विभागातील सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. यावेळी विध्यार्थ्यांसाठी सुरुची भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button