जळगाव जिल्हाजळगाव शहर

आधुनिकतेसोबत महिलांनी भारतीय मूल्यांचे जतन करावे : प्रणिता झांबरे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । आई ही पहिला गुरु असते. मुलांच्या संगोपनात तिचा महत्वाचा वाटा असतो. आजची स्त्री ही आधुनिकतेसोबत कुटुंबाची जबाबदारी आणि करियर यांचा उत्तमरित्या समतोल साधत आहे. मात्र यासोबत भारतीय मूल्यांचे जतन देखील तिने करावे असे विचार केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी व्यक्त केले.

जागतिक महिला दिनानिमित्त केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, महिला अधिकारी प्रा. डॉ. वंदना चौधरी उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हटल्या की, भारतीय संस्कृती ही जगात महान असल्याने आपल्या जडणघडणीत तिचा मोठा वाटा आहे. यामुळे त्या मूल्यांचे जतन करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी तिच्या कर्तुत्वाने व्यापले आहे. आणि भविष्यात ते आणखी व्यापक होईल यात शंका नाही असे विचार अध्यक्षीय मनोगतात डॉ. राणे यांनी व्यक्त केले. यानिमित्ताने विद्यार्थिनीनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक प्रा. डॉ. वंदना चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन अंकिता मगर तर आभार अश्विनी सोनार हीने मानले.

यावेळी शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. केतन चोधरी, प्रा. पंकज पाटील, प्रा. रामलाल शिंगाने, प्रा.कुंदा बाविस्कर, प्रा. स्वाती चव्हाण, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. रंजना सोनवणे, प्रा. निलेश जोशी, प्रा. अंजली बन्नापुरे, प्रा. सुनीता नेमाडे, प्रा. गणेश पाटील, प्रा. जयश्री पाटील, प्रा. शेलेजा भंगाळे, प्रा. संदीप केदार, प्रा. केतकी सोनार संजय जुमनाके आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button