⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा उद्या “पदवीदान समारंभ”

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या ऑडीटोरीयममध्ये सकाळी ११ च्या सुमारास हा सोहळा होणार असून या सोहळ्याला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर, कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी हे अध्यक्षीय भाषण करणार आहेत तर कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील हे उपस्थित स्तानकांना उपदेश देणार आहे. तसेच रायसोनी ग्रुप ऑफ इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी व कार्यकारी संचालक श्री. प्रितमजी रायसोनी हे प्रमुख पाहुणे म्हणून या समारंभास उपस्थित राहणार असल्याची माहिती रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या समारंभात एकूण ८११ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असून यामध्ये एमबीएचे १८९, आयएमसीएचे ७५, एमएमएसचे ०७, बीबीएचे २५९, बीसीएचे २५९, डीएमसीएचे २२ असे सर्व शाखेचे एकूण ८११ विद्यार्थ्यांचा या पदवीदान समारंभात समावेश असल्याची माहिती जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून देण्यात आली. सदर पत्रकार परिषदेला उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, परीक्षा नियंत्रक अविनाश पांडे, प्रा.रफिक शेख, प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. तन्मय भाले, प्रा. सौरभ गुप्ता तसेच संयोजक समिती व सर्व शाखेतील विभागप्रमुख उपस्थित होते.

१० विद्यार्थ्यांनी केली सुवर्ण पदकांची कमाई

एमबीए-२०२०-२१ यावर्षात कपिल बटूसिंग परदेशी तर २०२१-२२ मध्ये ज्ञानल रवींद्र बोरोले, आयएमसीए-सागर कांतीलाल पाटील, एमएमएस-आशिष शामलाल कुकरेजा, बीबीए-२०२०-२१ यावर्षात मुस्कान सुनीलकुमार मंधान तर २०२१-२२ मध्ये ख़ुशी गणेश रावलानी, बीसीए-२०२०-२१ यावर्षात लिसा महेश मांधवाणी तर २०२१-२२ मध्ये दिप्ती धनराज जाधव , बीसीए इंटेग्रेटेड- निकिता सुनील रायपुरे, डीएमसीए-साक्षी कमलेश अग्रवाल