⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

1 जुलैपासून तुमच्याशी संबंधित हे 11 नियम बदलणार ; जाणून घेणे तुमच्यासाठी आहे महत्वाचे

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । एक दिवसानंतर जुलै महिना सुरू होईल. यावेळी १ जुलैपासून अनेक मोठे बदल होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक गोष्टी बदलत असल्या तरी या वेळी १ जुलैचा दिवस खास असेल, कारण यावेळी १-२ नाही तर तब्बल १० गोष्टी बदलणार आहेत. १ जुलैपासून देशभरात कामगार संहितेचे नवे नियम लागू होतील. त्याच्या अंमलबजावणीमुळे, नोकरदार व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बदलेल. कामाचे तास 12 आणि वीकऑफ तीनपर्यंत वाढणार आहे.

गॅस सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलते. गेल्या काही महिन्यांपासून ज्या पद्धतीने दर वाढत आहेत, ते पाहता यंदा १ जुलैपासून पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे. यावेळी विनाअनुदानित गॅस सिलिंडर आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर या दोन्हींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

हा बदल ऑनलाइन खरेदीदारांसाठी आहे. १ जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग कंपन्या, व्यापारी आणि पेमेंट गेटवे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रेडिट आणि डेबिट कार्ड डेटा सुरक्षितपणे साठवू शकणार नाहीत. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन RBI १ जुलैपासून कार्ड टोकनायझेशन प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीमध्ये, कार्डचे तपशील टोकनमध्ये रूपांतरित केले जातील.

तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे केवायसी पूर्ण केले नसेल, तर ते १ जुलैपूर्वी पूर्ण करा. १ जुलैनंतर केवायसी अपडेट करता येणार नाही. यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो. यापूर्वी डीमॅट खात्यांसाठी केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती परंतु नंतर ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली.

पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे, परंतु या तारखेपर्यंत लिंक केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. पण 30 जूनपर्यंत दोन्ही कागदपत्रे लिंक केल्यास 500 रुपये दंड आहे. लिंक पूर्ण झाली नसेल तर १ जुलैपूर्वी पूर्ण करून घ्या.

1 जुलै 2022 पासून व्यवसायाकडून मिळालेल्या भेटवस्तूंवर 10% TDS ची तरतूद आहे. कराची ही तरतूद सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे आणि डॉक्टरांनाही लागू होईल. कंपनीने दिलेले उत्पादन परत केल्यास टीडीएस लागू होणार नाही.

जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्येही गुंतवणूक केली असेल तर हे तुमच्यासाठी आहे. क्रिप्टो गुंतवणूकदारांना 30 टक्के करानंतर आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कराव्यतिरिक्त, क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 1 टक्के टीडीएस देखील भरावा लागेल.

१ जुलैपासून होणारा हा बदल दिल्लीकरांसाठी आहे. 30 जूनपर्यंत मालमत्ता कर जमा केल्यास सरकारकडून 15 टक्के सूट दिली जात आहे. ३० जूननंतर म्हणजेच १ जुलैपासून तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकणार नाही.

1 जुलैपासून देशातील आघाडीची दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने किमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि वाढती महागाई लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. Hero MotoCorp च्या घोषणेनंतर इतर कंपन्याही किमतीत वाढ करतील अशी अपेक्षा आहे.

वाढत्या उन्हामुळे १ जुलैपासून एसीही महाग होणार आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी ने AC साठी एनर्जी रेटिंगचे नियम बदलले आहेत. 1 जुलैपासून लागू होणार्‍या या बदलांनंतर 5 स्टार AC चे रेटिंग 4 स्टार करण्यात येणार आहे. यासह, किंमत 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.

टाटा मोटर्सनेही व्यावसायिक वाहने महाग केली आहेत. टाटाने व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. विविध मॉडेल्स आणि प्रकारांवर आधारित वाढीव किमती 1 जुलै 2022 पासून लागू होतील.