जळगाव जिल्हाजळगाव शहर

रॉबिन हूड आर्मीतर्फे अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२१ । भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो. याचे औचित्य साधत येथील रॉबिनहूड आर्मीने जादूगाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अनोख्या पद्धतीने बालदिवस साजरा केला.

aarmy jpg webp

मुलं म्हणजे देवा घरची फुलं’जवाहरलाल नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहता दरवर्षी विविध उपक्रम घेऊन बालदिवस साजरा केला जातो. जळगांव येथील समता नगर परिसरात रॉबिन हूड आर्मीतर्फे प्रसिद्ध जादूगार अविनाशजी दुसाने यांच्या मॅजिक शोचे आयोजन केले गेले. रॉबिन हूड आर्मीच्या सदस्या संगीता चावला यांनी अविनाशजींचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात केली. अविनाशजींनी वेगवेगळे जादू प्रस्तुत केले व खूप मजेदार गोष्टी सांगितल्या. मुलांनी तसेच परिसरातील लोकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. खाऊ वाटप करून बालदिन मजेत साजरा करण्यात आला.

यांची उपस्थिती होती 

या कार्यक्रमाला दर्शन जैन, इरफान पिंजारी, दीपक अहुजा, अमित गगनानी, नयन गांधी, दिव्या पाटील, धनश्री माळी, आशिष पाटील,संगीता चावला, काजल रावलानी, अनुप तेजवानी, गौरव लावंगे, आरोही नेवे, ऐश्वर्या पाटील, नितीन पाटील, किरण तायडे, जितेंद्र साळुंखे, नयनकुमार पाटील, सागर बामरूळे, अलफिज पटेल, रितेश पाटील, या रॉबिन्सची उपस्थिती होते.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button