⁠ 
मंगळवार, मार्च 5, 2024

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे मतदान जागृती

जळगाव लाईव्ह न्यूज। १८ ऑगस्ट २०२३। गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडियम सी बी एस ई स्कूल सावदा येथे ११ ऑगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांची निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. मतदानाचा अधिकार, हक्‍क आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.

तसेच शाळेचा विकास आणि लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यामध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जावा, म्हणून डॉ.उल्हास पाटील शाळेतील विद्यार्थ्याना यलो, ग्रीन, ब्लू रंगातील या हाऊस मध्ये विभागले आणि त्यानुसार त्यांच्या पदाचे नेमणूका करून त्यांच्यावर शाळेच्या शिस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली.

तसेच शिक्षकांनाही निवडणूक प्रक्रियेनुसार शाळेचे हेड शिक्षक, हेड शिक्षिका यांची नेमणूक केली. या उपक्रमासाठी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंचे सहकार्य लाभले. अतिशय शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.