⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

उपचारासाठी आलेल्या डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ ऑगस्ट २०२३। पोट दुखते म्हणून उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी (ता.२३) दुपारी साडेतीनच्या सुमारास नर्मदा फाउंडेशन येथे घडली. धानोरा (ता. अमळनेर) येथील माहेर असलेल्या एका महिलेचे १० ते १२ दिवसांपासून पोट दुखत असल्याने ती धुळे येथील गणपती पॅलेस समोरील दवाखान्यात गेली होती. तेथे सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला अँपेंडिक्स सांगितले व अमळनेर येथे डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशनमध्ये पाठवले.

बुधवारी (ता. २३) दुपारी साडेतीनच्या सुमारास उपचार घेताना डॉक्टरांनी पीडितेचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पीडित महिला अनुसूचित जमातीची असल्याने तिच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात संशयित डॉक्टरांविरुद्ध विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर करीत आहेत.