गुन्हेजळगाव शहर

जळगाव हादरले ! ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२५ । जळगाव शहर तरुणाच्या खुनाच्या घटनेने हादरले आहे.  ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाली. ही घटना जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरात ३ मे रोजी रात्री ११ वाजता घडली आकाश पंडीत भावसार (वय ३०, रा. अयोध्या नगर) असं खून झालेल्यातरुणाचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

akash bhavsar

आकाश भावसार हा परिवारासह अयोध्यानगरात राहत होता. तो ट्रान्सपोर्ट नगरामध्ये वाहन भरण्याचे काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता.दरम्यान अनेक महिन्यांपासून आकाशची पत्नी सातत्याने माहेरी जात होती. त्यामुळे त्यांच्या घरी कौटुंबिक वाद सुरू होता. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आकाशच्या सासरच्या मंडळींनी हॉटेल ए वन जवळ आकाश सोनार याला गाठले.

कौटुंबिक वादातून आकाशवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मांडीवर, छातीवर आणि गुप्तांगाला गंभीर वार करून जखमी केले.आकाश यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय पथकाने तपासून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ४ संशयीत तरुणांची नावे समोर आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button