⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

अवघ्या काही तासात जळगावात सोनं 1300 रुपयांनी महागले, चांदीही 1000 नी वाधरली..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२३ । गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात घसरण होत असल्याचे दिसून आले. मात्र अवघ्या काही तासात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या दराने 56 हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला आहे.

जळगाव सुवर्ण नगरीत काही तासात सोन्याच्या किमतीत 1300 रुपयाची मोठी वाढ झाली आहे. याच सोबतच चांदी देखील तब्बल 1000 रुपयांनी वाधरली आहे. यामुळे सध्या सोन्याचा दर 56 हजार 600 रुपये प्रति तोळ्यापर्यंत विकले जात आहे. यापूर्वी काल बाजारबंद वेळी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 55300 रुपये इतका होता. मात्र त्यात मोठी वाढ झाली.

यासोबतच चांदीच्या किमतीत 1000 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर 64000 हजार रुपयांवर गेला आहे. यापूर्वी काल चांदीचा प्रति किलोचा दर 63000 हजार रुपये इतका होता.

गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारीला सोन्याने 58,800 रुपयांहुन अधिकची विक्रमी पातळी गाठली होती. मात्र त्यानंतर दोन्ही धातूंमध्ये घसरण दिसून आली. उच्चांक पातळीपासून सोने अद्यापही 2200 ते 2250 रुपायांनी स्वस्त विकले जात आहे. सोन्या-चांदीत घसरण होत असली तरी मात्र आगामी काळात दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढण्याची शक्यता आहे.

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.