Thursday, May 26, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

अतिक्रमण काढताना पोलिसांना मारहाण, माजी गटनेता पुत्राला अटक

atak
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
February 27, 2022 | 3:04 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२२ ।‎ शहरात पालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण‎ हटाव मोहीम राबवणे सुरू आहे. ‎ शुक्रवारी खडका रोडवर चांगलाच राडा‎ झाला. खडका रोड भागातील‎ एम.आय.तेली बिल्डर कार्यालया समोरील‎ गटारी वरील ढाप्याचे अतिक्रमण काढणे‎ सुरू होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते‎ मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली‎ यांनी पथकाला अटकाव केला. हा वाद‎ सोडवण्यासाठी आलेले पोलिस अधिकारी,‎ कर्मचाऱ्यांना शिविगाळ, धक्काबुकी केली.‎ त्यामुळे पोलिसांनी आशिकला अटक करुन‎ शासकीय कामात अडथळा, लोकसेवकास‎ मारहाण, धक्काबुकी, शिविगाळ केल्याचा‎ गुन्हा दाखल केला.

दरम्यान, शुक्रवारी‎ दिवसभरात पालिकेने शहर पोलिस ठाणे‎ हद्दीत १४, तर बाजारपेठ च्या हद्दीत ५४‎ अशी ६८ अतिक्रमणे नष्ट केली.‎ पालिकेने गुरुवारपासून जळगाव रोड,‎ हंबर्डीकर चौक, जामनेर रोडवरील‎ अतिक्रमण काढले. यानंतर शनिवारी‎ दुसऱ्या टप्प्यात कारवाई झाली. त्यात‎ पालिकेचे पथक दुपारी १ वाजेच्या सुमारास‎ खडका रोड भागात अतिक्रमण काढत होते.‎ यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली‎ यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी गटारी‎ वरील ढापा तोडू नका, असे सांगत स्थापत्य‎ अभियंता विजय तोष्णीवाल, वसंत राठोड,‎ आरेखक महेश चौधरी यांच्याशी हुज्जत‎ घातली. जेसीबी चालक राहुल बारी याला‎ शिविगाळ करत अतिक्रमण काढण्यास‎ विरोध दर्शवला. यावेळी सहाय्यक पोलिस‎ निरीक्षक हरीष भोये हे समजावण्याचा‎ प्रयत्न करत होते. मात्र, आशिकने भोये‎ यांची कॉलर पकडून धमकावले. जळगावच्या आरसीपी क्रमांक २ मधील कर्मचारी एस.एस.तडवी हे पुढे आले. मात्र,‎ त्यांनाही धक्काबुक्की झाली. तडवी यांची कॉलर पकडून शर्टाची दोन बटणे तोडली. या प्रकारात सहायक निरीक्षक‎ भोये यांच्या मानेजवळ, कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या उजव्या हाताला जखम झाली. यानंतर पोलिसांनी आशिकला‎ तत्काळ अटक केली. पोलिस कर्मचारी सुनील तडवी यांच्या फिर्यादीवरून आशिक विरूद्ध शासकीय कामात‎ अडथळा , पोलिस अधिकाऱ्यांना शिवीगाळ, इच्छा पूर्वक दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.‎

‎
निरीक्षकांकडून‎ मारहाणीची तक्रार‎

अतिक्रमण हटाव मोहिमेचे वार्तांकन‎ करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर‎ आमले हे आशिक तेली यांना मारहाण‎ होत असल्याचे छायाचित्र व‎ व्हीडिओचित्रण करत होते. याचा राग‎ आल्याने बाजारपेठेचे पोलिस निरीक्षक‎ राहूल गायकवाड यांनी आपल्याला‎ मारहाण केली, अशी तक्रार आमले यांनी‎ जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली.‎ गायकवाड यांनी मोबाइल हिसकावून‎ कानशिलात लगावली. तोंडावर मारहाण‎ करत खोटा गुन्हा दाखल करण्याची‎ धमकी दिली. त्यांच्यावर कारवाई करावी,‎ अन्यथा सोमवारपासून (दि.२८)‎ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत‎ उपोषणाला बसू असा इशारा दिला.

६८ अतिक्रमणे हटवली‎

पालिकेच्या १०० कर्मचाऱ्यांच्या ७‎ पथकांनी शनिवारी सकाळपासून‎ अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली.‎ गुरुवारी जामनेर रोडवरील अर्धे‎ अतिक्रमण काढलेल्या भोळे भरीत-पुरी‎ सेंटरचे संपूर्ण अतिक्रमण शनिवारी‎ काढण्यात आले. यानंतर जामनेर रोड,‎ खडका रोड, गवळी वाडा, जळगाव रोड‎ मामाजी टॉकीज भागातील अतिक्रमणांवर‎ हातोडा पडला. शनिवारच्या कारवाईत‎ बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत ५४, शहर‎ हद्दीत १४ अतिक्रमणे काढले. पुन्हा‎ अतिक्रमण केल्यास थेट गुन्हा दाखल‎ करण्याचा इशारा पालिकेने दिला.‎

पोलिसांनी दिला प्रसाद
पोलिसांनी घटनास्थळावरून आशिक तेली‎ याला शासकीय वाहनाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले. तत्पूर्वी, रजा चौक‎ भागातील हॉटेल फिरदोस जवळ पोलिस व्हॅन थांबवली. तेथे आशिकला वाहनातून‎ खाली उतरवून खाकीचा प्रसाद दिला. ही धुलाई करताना कोणीही छायाचित्र किंवा‎ व्हिडीओ शुटींग करू नये, याची दक्षता घेतली. शहरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण‎ करण्यासाठी यापूर्वी कुख्यात आरोपी निखिल राजपूतला हीच ट्रिटमेंट दिली होती.‎

  • Avinash Bhosale : डीएचएफएल घोटाळा प्रकरणी अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक,
  • जळगावात दुचाकी चोरीचे सत्र कायम : दोन दुचाकी लंपास
  • ‘एमपीएससी’त यशाने दिली हुलकावणी, नैराश्यातून तरुणाने बहिणीच्या घरी मृत्यूला कवटाळले
  • पत्नीला घेण्यास गेलेला पतीला सासुरवाडीत मारहाण, डोंगर कठोरामधील घटना
  • ट्रॅक्टर चोरी : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याच्या मुलासह एकाला एलसीबीने पकडले

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
koutuk

इंटरनॅशनल पाेस्टर चित्र स्पर्धा : पाचोऱ्याच्या अक्षय पाटील, अजय विसपुते यांच्या चित्रांना पारिताेषिक

khalse

खडसेंचा पाठपुरावा : खिरोदा शिवारात २० दिवसांनंतर रोहित्र‎ बसवल्याने केळीच्या बागांना जीवदान

rasta roko

शिवारात चोऱ्या सुरूच पुन्हा ठिबक जाळले, केळी कापली : संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.