जळगाव लाईव्ह न्यूज । जुने जळगाव मधील विठ्ठल पेठ भागातील न्यु बाल मित्र मंडळ “राजा बदाम गल्लीचा” येत्या 31 जुलै रोजी 24 फुट गणपती बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी मुंबईला रवाना होत आहे. सोबत तेजस काळे, भैरव खडके, आकाश झोपे, रोहन झोपे, बंटी खडके,चंद्रकांत पाटील, पियुष काळे, प्रशांत खडके, अनिकेत ढाके, डीगंबर सरोदे, गुंजन काळे, रोहित नेमाडे, लोकेश खडके, कपिल खडके, उमेश माळी, दुर्वेश झोपे, कल्पेश काळे, प्रथमेश विसपुते, प्रशांत पाटील, उदय खर्चे, आलोक काळे इतर कार्यकर्ते व जुने जळगाव परीवारातील मित्र मंडळी रवाना होत आहे यासाठी जुने जळगाव भागातील इतर मंडळांचे सुद्धा सहकार्य लाभले आहे.

२ ऑगस्ट रोजी मुंबईतील बोरिवली येथील सिद्धिविनायक आर्ट मूर्तिकार किरण जाधव यांच्या कार्यशाळेतून गणपती बाप्पाचे आगमन काढून बाप्पाची मूर्ती जळगावला ६० तासांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

जळगाव मुंबई जळगाव असा भिवंडी, कसारा घाट, इगतपुरी, नाशिक, धुळे मार्गे जळगाव एकूण ९०० किलोमीटर चा ५ दिवसांचा प्रवास ३ रात्र मुक्कामासह ट्रॅक्टर ट्रॉलीने होणार आहे.












