⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवारी वीजबिल भरणा केंद्र सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ ।संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत. त्यानुसार जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत. ही उपलब्ध सुविधा तसेच डिजिटल माध्यमांद्वारे ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे महावितरणने केले आहे.


    अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल ॲपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून सुरक्षित व सुलभपणे वीजबिल भरता येते.

याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.