---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

जळगावात पुन्हा भीषण अपघात ; तिघे गंभीर, दोन जखमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढताना दिसत असून अशातच आणखी एक मोठा भीषण अपघात समोर आला आहे. इंडिका कारला बोलेरोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले असून यात तिघे गंभीर जखमी झाले आहे ही घटना जळगाव शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गवरील खोटे नगर परिसराजवळील उड्डाणपुलानजीक घडली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

New1 jpg webp

याबाबत असे की शहरातील खोटे नगरात राहणारे सचिन सुनील पाटील हे त्यांच्या परिवारासह बाहेर निघाले होते. त्यावेळी खोटे नगर जवळ असलेल्या पुलाजवळ एका भरधाव आलेल्या बोलेरोने इंडीका कारला जबर धडक दिली. यात सचिन पाटील यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर सचिन यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतीक्षा सचिन पाटील (वय २३) यांच्या डोक्याला, हाताला, पाठीला तर मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) याच्या उजव्या हाताला जबर मार लागला आहे. सचिन यांच्यासह त्यांचे सासरे विनोद सोपान पाटील (वय ५१) आणि पत्नीची बहीण नंदिनी विनोद पाटील (वय १९) हेदेखील जखमी झाले आहेत.

---Advertisement---

दरम्यान, तालुका पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्याचे काम सुरु होते. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---