जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२२ । शहरात दोन ठिकाणी चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या पाच संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यावर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आला.
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेहरूण स्मशानभूमीजवळ व एमआयडीसी परिसरातील जुनी ट्रायडंट कंपनीजवळ चोरी, घरफोडी करण्याच्या उद्देशाने काही संशयित फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, सचिन पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, योगेश बारी, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने सलमान अजिम तडवी (वय २५), सुनील शेषमल चव्हाण (वय २४), तुषार डिगंबर सासवडे (वय ३०), महावीर किशोर जैन (वय ३१) व शोएब बेग मुश्ताक बेग (वय २६, सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- Breaking : जळगावात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात
- बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना
- धक्कादायक ! जळगाव शहरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबारीची घटना
- ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले