बहिणीच्या लग्नाच्या दिवशी भावाचा हृदयविकाराने मृत्यू ; यावल तालुक्यातील दुर्दैवी घटना

नोव्हेंबर 18, 2024 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या भावाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. राकेश लिलाधर सरोदे असे मृताचे नाव आहे.

crime 5 jpg webp

डोंगरकठोरा येथील लीलाधर रामा सरोदे यांची मुलगी नमिता हिचा विवाह दहिगाव येथील राहुल लीलाधर पाटील याच्याशी १७ रोजी नियोजित होता. त्यासाठी शनिवारी रात्री वर पक्षाकडील मंडळींनी नाचगाण्याचा आनंद लुटला. पण, १७ रोजी पहाटे दोन वाजेचे सुमारास नववधू नमिता हिचा लहान भाऊ राकेश याचा डोंगरकोठारा येथील स्वामीनारायण मंदिरात झोपलेला असताना हृदयविकाराने मृत्यू झाला.

राकेशला त्याचे वडील लीलाधर सरोदे यांनी स्वामीनारायण मंदिरात सेवेकरी म्हणून सुपूर्द केले होते. तो गुजरात राज्यातील वडताल येथील स्वामीनारायण मंदिरात राहत होता. बहिणीच्या लग्नासाठी राकेश १६ नोव्हेंबरला रात्री डोंगरकठोरा येथे आला. यानंतर स्वामीनारायण मंदिरातच निवास केला. झोपेतच पहाटे २ वाजेच्या सुमारास राकेशला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गुजरातमधील वडताड येथे रवाना करण्यात आला. या दुखद प्रसंगानंतर रविवारी राहुल आणि नमिताचा विवाह साध्या पद्धतीने पार पडला. राकेशच्या पश्चात आई, भाऊ आणि ही नमिता असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now