गुन्हेजळगाव जिल्हा

ऑनलाईन नंबर शोधणे पडले महागात; तरूणाला १० लाखात गंडविले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यातच रुग्णालयाच्या अपॉईंटमेंटसाठी सायबर ठगांनी एक फाईल पाठवून व बँक खात्याची माहिती घेऊन विश्वेष प्रदीप बाविस्कर (33, रा. जामनेर) यांची १० लाख रुपयांनी फसवणूक केली.

रुग्णालयाचा क्रमांक ऑनलाइन शोधून त्यावर संपर्क साधल्यानंतर ११ ते १४ नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडला. जामनेर येथील खासगी क्लासेस चालक असलेले विश्वेष बाविस्कर यांचे वडील प्रदीप बाविस्कर यांच्या उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयाच्या अपॉईंटमेंटसाठी क्रमांक हवा होता. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर ऑनलाइन हा क्रमांक शोधला. त्यानंतर त्यांना डॉ. राकेश असे नाव सांगणाऱ्याने त्यांच्याशी संपर्क साधून अपॉईंटमेंटसाठी एक फाईल पाठविली.

तसेच प्रदीप बाविस्कर यांचा बैंक खाते क्रमांक, एटीएम कार्ड क्रमांक व सीव्हीव्ही क्रमांक अशी सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून १० लाख रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विश्वेष बाविस्कर यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संपर्क साधणाऱ्या अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button