Breaking ! जळगाव MIDC परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

नोव्हेंबर 14, 2025 12:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही

fire

जळगावातील एमआयडीसी परिसरातील आर्यावर्त प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत होते.

दरम्यान, नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी महानगरपालिकेच्या ५ ते ६ बंबांद्वारे आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now