⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

लाचेची मागणी भोवली : सहकार अधिकारी जाळ्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । घराची दप्तरी नोंद घेवून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयाची लाच मागणाऱ्या सहकार अधिकारी, उप निबंध व सहाय्यक सहकार अधिकारी जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकार?
याबाबत असे की, तक्रारदार यांनी जळगाव शहरातील सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केलेले होते. सदर घराची दप्तरी नोंद घेवून त्याबाबतची ताबा पावती तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे विजय सुरेशचंद्र गोसावी (वय-54, व्यवसाय-नोकरी, सहकार अधिकारी, उप निबंध सहकारी संस्था,तालुका जळगांव वर्ग-3) व चेतन सुधाकर राणे (वय-48, व्यवसाय-नोकरी, सहाय्यक सहकार अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,रावेर प्रतिनियुक्ती. उप निबंधक सहकारी संस्था,तालुका जळगांव) यांनी पंचासमक्ष 5,000/-रुपये लाचेची मागणी उप निबंधक सहकारी संस्था,तालुका जळगांव कार्यालयात केली.

याबाबत तक्रारदार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो, जळगाव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज मंगळवारी लाच मागणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
PI.संजोग बच्छाव, PI.एन.एन.जाधव स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी ही कारवाई केली.