⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा : न्यायालयाचे आदेश

तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करा : न्यायालयाचे आदेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर पुंडलिक अहिरे यांच्याविरुद्ध खोटे दस्तावेज तयार तसेच पदाचा दुरुपयोग करून पिंपळगाव हरेश्वर येथील तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप उत्तम पाटील यांनी सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सपाेनि संदीप पाटील यांच्या विरोधात ज्ञानेश्वर अहिरे यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला होता. मात्र त्यावेळी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी अहिरे यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सपाेनि संदीप पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात सपाेनि संदीप पाटील हे रुजू झाल्यानंतर मनमानी कारभार सुरू झाला होता. याच कालावधीत ज्ञानेश्वर अहिरे यांनी गावातील शासकीय जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतराबाबतची चौकशी हाेण्यासाठी पोलिस विभागीय अधिकारी व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात म्हणजे सपाेनि पाटील यांच्याकडे अर्ज दिला. परंतु हा विषय बीडीओंच्या अखत्यारीत हाेता. परंतु त्यांनी दिलेले अर्ज फाटे व नोटीसांमुळे सपाेनि पाटील राग मनात ठेवून वागू लागले. पोलिस बळाचा गैरवापर करून धोबी यांना पाेलिस ठाण्यात बोलावून त्रास देत. चौकशीबाबतचा अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला. मात्र त्यासबळी न पडता धाेबी यांनी त्यानुसार वागण्यास नकार दिला. त्यामुळे स्वतः फिर्यादीविरुद्ध पोलिस ठाण्यात एन.सी. दाखल करून घेत ज्ञानेश्वर धोबी यांनी बदनामी केली अशा खोट्या आशयाची एन.सी. रजिस्टरला नोंद करत एन.सी.च्या फिर्यादीविरुद्ध गैरकृत्य केल्याचा आरोप आहे.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह