
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । मुक्ताईनगर येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांचे कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. याच बाबतीत जिल्हा बँक संचालिका रोहिणी खडसे खेवलकर यांनी आमदारास देखील वेळ पडल्यास चोप देऊ असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. याचा निषेधार्थ सावदा शहर शिवसेनेतर्फे येथील पोलिसात निवेदन देत. सदर बाबतीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी जळगाव लाईव्ह न्यूजवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी आमदारांना चोप देण्याची भाषा केल्याची वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार तमाम जनतेचे लोप्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीच्या जीवितावर खडसे कुटुंबीय उठलेले दिसून येत असून, अतिशय वैफल्यग्रस्त झालेल्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्वयार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जवाबदार असेल असे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे व सदर व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष सूरज परदेशी, भरत नेहेते, धनंजय चौधरी, विश्वनाथ माळी, सुनील चौधरी, शाहरुख तडवी, अशरफ तडवी, सुभाष सपकाळे, गणेश माळी, किरण गुरव यांचेसह अनेक शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे देखील वाचा :
- अखेर तिढा सुटला! नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन, तर रायगडची धुरा भरत गोगावले यांच्याकडे!
- शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी जामनेरचे भाजप नेते संजय गरुडांना अटक ; जळगाव शिक्षण वर्तुळात खळबळ
- मोठी बातमी! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा
- जिल्हा परिषदसह पंचायत समितच्या भवितव्याचा २३ जुलैला फैसला! सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे इच्छुकांचे लक्ष!
- भुसावळ पालिकेत पुन्हा खळबळ! भाजप नगरसेविकाचा जातीचा दाखला रद्द






