भुसावळ येथे दोन गटात हाणामारी; १३ जणांविरोधात गुन्हा

एप्रिल 5, 2022 3:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । भुसावळ येथे दोन गटात हाणामारी प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीनुसार ४ रोजी सायंकाळी बाजारपेठ पोलिसांत १३ जणांविरुद्ध दंगल व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला. संशयितांमध्ये माजी नगरसेवक प्रकाश बत्रा व त्यांच्या भावाचा समावेश आहे.

crime 2

पहिल्या गटातर्फे अशोक चंद्रलाल चुगेजा (सिंधी कॉलनी, भुसावळ) यांनी तक्रार दिली. त्यात प्रकाश रमेशलाल बत्रा, विकी रमेशलाल बत्रा यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (दि.१) तक्रारदाराला भगवान झुलेलाल यांची प्रतिमा असलेला कंदील खाली पडल्याचे दिसले. त्यांनी संशयित निकी बत्रा यांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर बत्रा यांनी तेथे येऊन संशयीतांसह बेदम मारहाण केली. दुसऱ्या गटातर्फे माजी नगरसेवक प्रकाश (निकी) बत्रा यांनी फिर्याद दिल्याने अशोक चंद्रलाल चुगेजा, कुणाल दिलीपकुमार छाबडीया, दिलीपकुमार गोवर्धनदास छाबडीया, नारायण अशोक ठारवानी आदींवर गुन्हा नोंदवला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now