⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

उत्सव : थंडीतून गरमाईकडे नेणाऱ्या ‘मकर संक्रांती’चे विविध पैलू

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । इंग्रजी वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा हिंदू धर्मियांचा पहिलाच सण मकर संक्रांत. तस पाहिलं गेलं तर प्रत्यक्ष सणाचे एक विशिष्ट महत्व, पारंपरिक, शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण असतात. त्याच प्रकारे मकर संक्रांत यामागे देखील एक विशिष्ट कारण आहे. हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

‘मकर संक्रांती’ साजरी करण्याचे कारण

दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये सूर्याचे उत्तरायण सुरू होते. यातच मकर हि एक रास आहे. सूर्य वर्षाच्या सुरुवातीला मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि याच प्रक्रियेला मकर संक्रांत असे म्हटले जाते. सूर्याची किरणे डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पृथ्वीच्या साडेतेवीस दक्षिणी या अंक्षांशावर लंबरूपात पडायला सुरुवात होतात. आणि या दिवसापासून सूर्य हळूहळू उत्तरेकडे सरकत जातो. तसेच सूर्याला अगदी प्राचीन काळापासून देवासमान स्थान दिले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन घेतली जाते, जल अर्पण केले जाते. त्यानंतर दैनंदिन जीवनाला सुरवात होत असते.

शतकांपासून साजरा होतेय मकर संक्रांत

सोळाव्या शतकामध्ये हा सण ९ किंवा १० जानेवारी या तारखेला यायचा. कालांतराने जसजसं शतक बदलत गेलं तसतसं या तारकांमध्ये देखील बदल जाणवला. प्रत्येक शतकामध्ये एक‌ एक तारीख पुढे सरकते आणि येणाऱ्या काही शतकांमध्ये मकर संक्रांतिची तारीख जानेवारीच्या अंतिम आठवड्यात येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आहे. तसेच २०२२ यावर्षात १४ जानेवारीला मकर संक्रांतचा मुहूर्त घडून आला आहे. जो कि आज आहे.

मकर संक्रातीची देशभरात वेगळी ओळख

उत्तर भारतामध्ये हिमाचल प्रदेश आणि पंजाब या दोन प्रांतांमध्ये मकर संक्रांत हा सण ‘लोहडी’ किंवा ‘लोहरी’ या नावाने साजरा केला जातो. व तिथं हा सण १३ जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. तिकडे या सणाचं विशेष असे महत्त्व आहे. हिवाळा असल्यामूळे हा सण शेकोटी पेटवून साजरा केला जातो. पूर्व भारतामध्ये बिहार प्रांतांमध्ये मकर संक्रांतीची “संक्रान्ति” आणि “खिचडी” अशी दोन नावे आहेत. तर आसाम मध्ये संक्रांतीला भोगळी बिहू या नावाने ओळखलं जातं. गुजरात व राजस्थान मध्ये तर मकर संक्रातीला ‘पतंगनो तहेवार’ या नावाने ओळखलं जातं. दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये संक्रांति हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो. हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस भोगी पोंगल असतो त्या दिवशी होळी पेटवली जाते आणि त्यामध्ये उपयोगी नसलेल्या वस्तू टाकल्या जातात. दुसऱ्या दिवशी सूर्य पोंगल हा सण साजरा केला जातो. व तिसरा दिवस हा मूडू किंवा कननू पोंगल या नावाने ओळखला जातो. आणि या दिवशी सूर्य देवाची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी भावाचं चांगलं व्हावं भावाला चांगला आयुष्य लाभावे म्हणून पूजा करून बहिणी भावांना ओवाळतात. नेपाळमध्ये हा सण माघी या नावाने साजरा केला जातो. थायलंडमध्ये सोंग्क्रान या नावाने मकर संक्रांती साजरी केली जाते. तर लाओस मध्ये पिमालाओ आणि म्यानमारमध्ये थिंगयान या नावाने मकर संक्राती साजरी केली जाते.

‘तिळगुळ’च का देतात?

या दिवशी तिळगुळ का देतात? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू किंवा वड्या आणि तीळगूळ देण्याचा मुख्य कारण म्हणजे हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो. आणि थंडी मध्ये मानवी शरीराला उष्णतेची गरज असते तीळ व गुळ हे उष्ण पदार्थ आहेत. ज्वारी व बाजरी च्या पिठामध्ये तीळ टाकून त्यांच्या भाकऱ्या केल्या जातात. त्या शिवाय त्याच्या जोडीला हरभरा, गाजर, मटार, चवळीची शेंग आणि तिळाच मिश्रण असलेली भाजी करण्याची पद्धत आहे. व तिळगुळ देताना ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ हे वाक्य आवर्जून बोललं जात या दिवशी तिळाचे लाडू आणि तिळगुळ वाटले जातात याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षभरात झालेल्या चुका, गैरसमज, अपमान, राग या सर्व गोष्टी विसरून आपण आपल्या परिवाराला मित्र-मैत्रिणींना तिळगुळाचे लाडू देतो. जेणेकरून आपल्या नात्यातील कडवटपणा जाईल आणि ह्याच्या पुढे संपूर्ण वर्षभर गोडवा रहावा.

दिवस-मोठा रात्र लहान

पौष महिन्यामध्ये हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत या सणाच्या आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रात होऊन गेल्यावर दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते आणि त्याशिवाय हवेतील गारवा देखील कमी होतो आणि उष्णता वाढायला सुरुवात होते.

‘हा’ असतो अशुभ काळ

प्राचीन ग्रंथांमध्ये मकर संक्रांतीचे महत्व सांगितलं गेलं आहे. महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शरशय्येवर ‌उत्तरायणाची वाट पाहत होते. त्याला इच्छामरण वरदान मिळालं होतं. ज्या दिवशी उत्तरायण सुरू झालं त्याच दिवशी त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. उत्तरायणाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो. संक्रांत सण देवस्थानी मानला जातो. या देवीने संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि आपल्या प्रजेला मुक्त केलं होतं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

हे देखील वाचा :