⁠ 
बुधवार, जुलै 24, 2024

..तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांचा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२४ । रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामागील कारण म्हणजेच येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. केळीच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. यामुळे तांदलवाडी येथील शेतकऱ्यांनी केळी पीक विमा रक्कम मिळेपर्यंत राजकीय नेत्याना गावा बंदी करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांच्या या निर्णयाने खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात ८१ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी हवामानावर आधारित केळी पीक विमा काढला होता. यापैकी दहा ते पंधरा हजार शेतकऱ्याना केळी पीक विमा माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात केळी उत्पादक शेतकऱ्यांनी शासन दरबारी तसेच राजकीय नेत्यांना भेटून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसून शेतकऱ्यांना पीक विमा रकमेची प्रतीक्षा आहे.

बैठक घेऊन एक मताने निर्णय
राजकीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतरही कोणताही मार्ग निघत नसल्याचे लक्षात आल्यावर आता या शेतकऱ्यांनी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय एक बैठकीमध्ये घेतला. तांदलवाडी येथील केळी (Banana Crop) उत्पादक शेतकऱ्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार आणि विमा कंपनी बाबत संताप व्यक्त केला आहे.