---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

गेल्या १५ दिवसांत शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । राज्यात अवकाळी पाऊस झाला. शेतक-यांच्या बांधवावर जाऊन पाहणी झाली. त्यानंतर नुकसानीचे अहवाल गेले. परंतु शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांत कुठली ही मदत मिळालेली नाही. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. यावेळी राज्यकर्त्यांनी पक्षाचा विचार न करता सर्वांबराेबर घेऊन शेतक-यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

sharad pawar jpg webp

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार हे साता-यात आहेत. पवार यांनी सातारा येथी रयत शिक्षण संस्थेच्या परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेत अण्णांना अभिवादन केले.

---Advertisement---

शरद पवार म्हणाले पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार व्यक्त केला होता मात्र कार्यकर्ते, साथीदारांच्या सहकार्यांच्या आग्रहामुळे मी थांबलो आहे. कार्यकर्त्यांमुळे मला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---