शेतकऱ्यांचे विजबील, भारनियमनबाबत पाठपुरावा करणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील

ऑक्टोबर 25, 2021 4:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्याच्या पोटाला जात, पात, धर्म नसतो. शेतकरी जिवंत राहीला पाहीजे म्हणून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने असून शेतकऱ्यांच्या विजबीलसह भारनियमनबाबत पाठपुरावा करणार आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असून सेवा देणारे उपक्रम सुरु राहावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

yawal 1 1 jpg webp

यावल पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा सोमवार दि.२५ रोजी पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदामंत्री आ. गिरीष महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा मतदार संघाच्या आमदार लता सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, उप सभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, कृउबासचे सभापती तुषार पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नरेंद्र कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुनील फिरके, नरेंद्र नारखेडे आदी उपस्थित होते.

त्यामुळे शेतकरी त्रस्त
याप्रसंगी बोलतांना आमदार गिरीश महाजन यांनी माजी आमदार कै. हरीभाऊ जावळे यांची आठवण काढून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी धडपडणारे, सतत पाठपुरावा करणारे होते. कै. हरीभाऊ जावळे हे नेहमी शेतकऱ्यांसाठीच झटत असत, असे सांगितले. दरम्यान, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतांना राज्य शासनाने वीजबिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला असुन प्रसंगी आत्महत्या करीत असल्याचे देखील प्रकार घडत आहे. यामुळे राज्यातला शेतकरी वर्ग वैतागला आहे, असेही ते म्हणाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीने टाकला बहिष्कार
यावल पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या या लोकार्पण सोहळ्यावर यावल-रावेर मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी प्रॉटोकॉलचा भंग झाल्यामुळे बहीष्कार टाकला.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास माजी जि.प. सदस्य हर्षल पाटील, कृषी उत्पन्नचे माजी सभापती नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, कांचन फालक, गोपालसिंग पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, किशोर कुलकर्णी, शिवसेनेचे पप्पू जोशी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सागर देवांग, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी तर सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले व आभार पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी मानले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now