जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । शिंदाड येथील एका ६० वर्षीय वृद्धाने शेतातील झाडास गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिंदाड ता. पाचोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व समाज विकास शिक्षण मंडळाचे संचालक दयाराम नारायण चौधरी (वय – ६०) यांनी दि. २ आॅगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच उत्तम महादु चौधरी यांचे शेतातील झाडास गळफास लावत आपली जीवन यात्रा संपवली. दयाराम चौधरी यांना ग्रामस्थांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. दयाराम चौधरी यांच्या आत्महत्ये मागील कारण समजु शकले नाही. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दयाराम चौधरी यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुल, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे