---Advertisement---
बातम्या

धुळेकरांनो सावधान! शहरात ३०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२५ । धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कारखान्यात बनावट पनीर बनविले जात होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) याची माहिती मिळताच, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्या पथकाच्या सहकार्याने छापा टाकण्यात आला. या कारवाईत जवळपास ३०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आले.या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सहा संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे समजते.

paneer dhule

गुढीपाडवा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुध व दुग्धजन्यपदार्थ असलेल्या पनीरसह खवा व मावा आदींना मोठी मागणी पाहता बाजारात बनावट पनीर विक्री होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार शौर्य दूध डेअरी नावाच्या कारखान्यावर गुप्तपणे टेहळणी करत छापा टाकण्यात आला.

---Advertisement---

तेव्हा,पनीरमधून आवश्यक असणारे फॅट काढून टाकलेले दूध पावडर आणि घातक रसायन एकत्र करून पनीर बनवले जात होते. हे रसायन मानवी आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.कारखान्यात काम करणाऱ्या सहा जणांची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, मोहाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान पनीरच्या नमुन्यांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून, अहवालानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ग्राहकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले असून मोहाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment