पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक तरी रोप लावावे – आ. राजूमामा भोळे

जून 12, 2023 12:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक तरी रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले.

जळगाव शहरातील मोहाडी रोड येथे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा मंडळ नऊ तर्फे रविवारी जळगाव शहराचे आमदारराजूमामा भोळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण महत्त्वाचे असल्याबाबत आमदार भोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

vruksha ropan jpg webp

याप्रसंगी मंडल नऊचे अध्यक्ष समर्थ राणे, रोहित सोनवणे, हर्षल सोनवणे, लकी चौधरी, संजय तिरमले आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now