⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

हर घर झंडा : जळगाव शहरात तब्बल सव्वा लाख घरांवर फडकणार तिरंगा

जळगाव लाईव्ह न्यूज । हर घर झंडा। भारतीय स्वतंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. यासाठी जळगाव महानगर पालिका जळगाव शहरात हर घर तिरंगा हि मोहीम राबवत आहे. या मोहिमे अंतर्गत जळगाव शहरातील प्रत्येका घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात येणार आहे. या अनुशंघाने जळगाव मनपा सज्ज झाली आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/क्रांतिकारक/ स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे,स्वांतत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी,या उदेशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आझादी का अमृत महोस्तव अर्थात स्वातंत्र्यचा अमृत महोस्तव अंतर्गत दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “हर घर झंडा“हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मनपा हाच उपक्रम राबवणार आहे.

तिरंगा झेंडा फडकविण्याबाबतचे नियम

भारतीय ध्वज संहिता २००५ चे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे ,तिरंगा हा निशुल्क असणार नाही. नागरिकांनी तो स्वेच्छेने विकत घेण्यासाठी लोकांना प्रेरित करण्यात यावे.तिरंग्याच्या निर्धारित केलेल्या किमतीमध्ये प्रत्येक घराने ध्वज खरेदी करावा लागेल.केंद्र शासनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत व विविध सरकारी कार्यालये/ संस्था हे साठवणुक व विक्री केंद्रे असतील.

तिरंगा झेंड्याचा आकार आयताकार असावा. तिरंगा झेंड्याची लाबी:रुंदी प्रमाण हे ३:२ असे असावे. तिरंगा बनविण्यासाठी खादी अथवा कॉटन,पोलीस्टर, सिल्क कापड या पासून बनविल्या जावू शकतो. झेंड्यामध्ये सर्वात वर केशरी,मध्यभागी पांढरा व खाली हिरवा रंग असा तिरंगा बनविला जातो.मध्यभागातील पांढऱ्या पट्टीवर २४ रेषांचे गोलाकार निळ्या रंगाचे अशोकचक्र असते.

प्रत्येक नागरिकाने तिरंगा झेंडा साहिताचे पालन करावे.
तिरंगा झेंडा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा.
तिरंगा झेंडा उतरविताना काळजीपूर्वक सन्मानाने उतरावा.
दिनांक ११ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमातर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकानी सन्मानाने व सुरक्षित ठेवावे.
अभियान कालावधी नंतर झेंडा फेकला जावू नये,तो सन्मानाने जतन करून ठेवावा.
अर्धा झुकलेला,फाटलेला, कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावला जावू नये.