जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । आज संपूर्ण राज्याचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे लागले आहे. नुकताच १२चा निकाल लागला आता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात कोकण विभाग पहिला आला आहे. तर नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. (Latets SSC Result)
दहावीचा निकाल ९३.८३ टक्के इतका लागला आहे. यात कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के इतका सर्वाधिक लागला आहे. मात्र नागपूरची मुलं मागे पडली आहेत. नागपूरमध्ये दहावीचा निकाल ९२.०५ इतका लागला आहे.तर नाशिकचा निकाल ९२.२२ टक्के लागला आहे.
विभागीय निकाल
पुणे: ९५.६४ टक्के
नागपूर: ९२.०५ टक्के
औरंगाबाद: ९३.२३ टक्के
मुंबई: ९३.६६ टक्के
कोल्हापूर: ९६.७३ टक्के
अमरावती: ९३.२२ टक्के
नाशिक: ९२.२२ टक्के
लातूर: ९२.६७ टक्के
कोकण: ९८.११ टक्के
निकाल कसा पाहायचा?
www.mahresult.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.
दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
रोल नंबर आणि जन्मतारीख टाका
निका दिसेल.