जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । एरंडोल येथे नगरपरिषदतर्फे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून नपाने शाडू माती पासुन गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण शहरातील विद्यार्थांना व नागरिकांना कार्यशाळे मार्फत देण्यात आले. यात सुमारे २००जणांनी सहभाग नोंदवून १२० शाडू माती मूर्ती तयार करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भडगांव नगर परिषदचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या बाबत मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत रोप देवून करण्यात आली. मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण जळगांव चे प्रशिक्षक श्री.शिवम सोनवणे यांनी दिले. एरंडोल नगर परिषद चे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री.विकास नवाळे यांनी स्वतः शाडू माती मूर्ती तयार करून त्याची स्थापना घरी करण्याचा निश्चय केला. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचे महत्व विषद केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा यशस्वी संपन्न झाली.
सर्वात सुबक व सुंदर मूर्ती बनविणारे प्रसाद खैरनार , दिव्या पाटील, गौरव भोई, निधी पाटील,कैलास देशमुख यांचे नगर पालिका तर्फे सन्मानचिन्ह सौ.छायाताई आनंद दाभाडे यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी मुलांना प्रोत्साहन म्हणून विशेष बक्षीस देण्यात आले. कार्यशाळे करीता विकास पंचबुधे, अजित भट,.योगेश सुकटे, देवेंद्र शिंदे, विक्रम घुगे, विवेक कोळी, दिपक गोसावी, राजेंद्र घुगे यांनी परिश्रम घेतले.