जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील बस आगारात १४ एसटी कर्मचारी २२ डिसेंबर रोजी संपातून बाहेर पडून कर्तव्यावर रुजू झाले. मात्र २४ डिसेंबर रोजी त्यापैकी ८ कर्मचारी पुन्हा संपात सामील झाले. संपतच राहु की कामावर जाऊ अशी द्विधा अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली असावी असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान शनिवारी एरंडोल बस आगारातून भडगावला एसटी सोडण्यात आली एकूण चार फेऱ्या होऊन ग्रामीण जीवनदायिनी प्रवाशांची वाहतूक केली
सध्यास्थितीत एरंडोल बस आगारातील निलंबित केलेल्या ३२ कर्मचार्यांवर पुढील कारवाई चालू आहे अशी माहिती बस आगाराच्या सूत्रांनी दिली सध्या या आगारात ६ कर्मचारी कामावर आहेत. यावरून स्पष्ट होते की अजूनही येथे एसटी कर्मचारी संपा वरच आहेत असे स्पष्ट होते.
हे देखील वाचा :
- पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय, ते कसे वापरले जाते? जाणून घ्या याबद्दल सर्वकाही
- लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार? मोठी अपडेट आली समोर
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- सोने 660 रुपयांनी महागले; खरेदीला जाण्यापूर्वी आजचे भाव पहा..
- सर्वसामान्यांसाठी खुशखबर! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला..