सोने 660 रुपयांनी महागले; खरेदीला जाण्यापूर्वी आजचे भाव पहा..

नोव्हेंबर 19, 2024 10:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२४ । यंदाच्या दिवाळीत सोने आणि चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ पाहायला मिळाली. त्यादरम्यान सोने प्रथमच प्रति तोळा ८० हजार रुपयांपेक्षा अधिकने वाढले तर चांदीने एक लाख रुपयाचा टप्पा गाठला. मात्र यांनतर दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली. आता लग्नसराईला सुरुवात झाली असून यादरम्यान सोन्याची मागणी वाढते. अशा परिस्थितीत त्यांच्या किमतीही वाढतात. मात्र, यंदा उलटेच घडत आहे.

gold silver rate jpg webp

सलग दोन आठवडे सोने चांदी दरात घसरण दिसून आली. यादरम्यान सोने 6 हजारांच्या घरात तर चांदी 11 हजारांनी स्वस्त झाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने चढाई केली.

सोन्यात दरवाढ
गेल्या आठवड्यात सोन्याची किंमत 1300 रुपयांनी उतरली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोने 660 रुपयांनी महागले. सोमवारी सोन्याने उसळी घेतली. आज सकाळच्या सत्रात सुद्धा मौल्यवान धातुत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,010 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण
गेल्या दोन आठवड्यात चांदीला मोठी मजल मारता आली नाही. चांदी गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी उतरली. आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 89,500 रुपये इतका आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now