⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Twitter साठी एलोन मस्कने विकले टेस्लाचे ४४ लाख शेअर्स

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी कंपनीचे ४४ दशलक्ष शेअर्स (Share) विकले आहेत. या शेअरची किंमत सुमारे चार अब्ज डॉलर्स आहे. मस्कच्या या कराराकडे ट्विटरसाठी (Twitter)निधी उभारणीचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. यूएस सिक्युरिटीज फाइलिंग्जमधून ही माहिती समोर आली आहे.

मस्कने टेस्लाचे ४४ दशलक्ष शेअर्स विकले
फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले की, एलोन मस्क यांनी टेस्लाचे ४४ लाख शेअर्स विकले आहेत. हे शेअर्स $3.99 बिलियन पेक्षा जास्त विकले गेले आहेत. गेल्या काही दिवसांत, शेअरची विक्री $872.02 ते $999.13 प्रति शेअर झाली होती. मस्कने यापूर्वीही टेस्लाचे शेअर्स विकले आहेत.

मस्कचे लक्ष टेस्लावरून विचलित होऊ शकते
यानंतर इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, सध्या कंपनीचे आणखी शेअर्स विकण्याचा कोणताही विचार नाही. मंगळवारी बहुतांश शेअर्सची विक्री झाली असताना ते घसरले होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, टेस्लाच्या गुंतवणूकदारांना ट्विटरमुळे मस्कचे लक्ष टेस्लावरून वळवण्याची भीती आहे. त्याची ही इलेक्ट्रिक कार कंपनी चालवण्यातील रस कमी होईल.

ट्विटर डीलनंतर मोठा तोटा
इलॉन मस्कच्या ट्विटर डीलला अंतिम स्वरूप दिल्यानंतर टेस्लाच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली. मंगळवारी, समभाग एकाच दिवसात 12 टक्क्यांपर्यंत तुटले होते. कंपनीचे मार्केट कॅप $100 बिलियनने घसरले होते आणि ते $906 बिलियनवर आले होते.