⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | 150KM रेंज, फीचर्सही जबरदस्त!! Gogoro ने लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक बाईक

150KM रेंज, फीचर्सही जबरदस्त!! Gogoro ने लॉन्च केली नवीन इलेक्ट्रिक बाईक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । सध्या लोकांचाइलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढलेला दिसत आहे. बाजारात अशा अनेक इलेक्ट्रिक स्कुटी आहेत ज्या शंभरहुन अधिकचे रेंज देत आहे. यातच Gogoro ने आपली नवीन इलेक्ट्रिक बाईक Gogoro CrossOver लाँच केली आहे. या बाईकला टू-व्हील इलेक्ट्रिक एसयूवीच्या पद्धतीने प्रमोट केलंय.  आज आपण या Gogoro CrossOver बाईकच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत.

गोगोरोने क्रॉसओव्हर इलेक्ट्रिक बाईकची किमत काय असेल याची माहिती देण्यात आलेली नाहीये. परंतु किमतीविषयी लवकरच अपडेट दिली जाणार आहे. ही नवी बाईक दोन प्रकारात उपलब्ध करून देण्यात आलीय. क्रॉसओव्हर आणि क्रॉसओव्हर एस या नावाने ही दुचाकी लॉन्च करण्यात आलीय.

या बाईकचं पावर आऊटपुट ७.० kW आहे. तर क्रॉसओव्हर एसचं पावर आऊटपुट ७.६ kW आहे. या दोन्ही बाईक ६० ते ७० किमी प्रतितासच्या गतीने धावू शकते. एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही बाईक ३० किमी प्रति तासच्या स्पीडने १५० किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. यामुळे गोगोरो क्रॉसओव्हर एक पावरफूल बॅटरी सेटअप सह एक ड्राइवट्रेन देण्यात आलाय.

गोगोरो क्रॉसओव्हर बाईक ही चांगली डिझाइन आणि फॉर्म फॅक्टरसह आरामदायी आहे. जर तुमच्या गावाचा रस्ता व्यवस्थित नसेल तरीर Gogoro CrossOverची बाईक जोरात धावेल. कारण कंपनीने बाईकची चेसिस ऑफ रोडसाठी उपयुक्त राहील अशी बनवण्यात आलीय. या बाईकचा ग्राउंड क्लिअरेन्स १४.२ आहे.

इलेक्ट्रॉनिक स्कूटरला सामान ठेवण्यासाठी म्हणजे लगेज देण्यासाठी आलेली काही सोय ही खूप उपयुक्त आहे. ज्या लोकांचा काही वस्तू एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी न्यायच्या आहेत. त्या लोकांसाठी ही बाईक उपयुक्त ठरणार आहे. वस्तू वाहण्यासाठी जे फ्रेम देण्यात आलीय ती स्टीलची आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.