---Advertisement---
जळगाव जिल्हा

Election : सावदा पालिकेचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या कशी असेल रचना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । सावदा नगर पालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकी साठी दि. 13 रोजी सावदा पालिकेत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी शरातील 10 प्रभागातील 20 जागा साठी ही सोडत निघाली, यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यलय अधीक्षक सचीन चोळके, सतीष पाटील, यांनी यावेळी कामकाज पाहिले तर यावेळी नागरिकांतून माजी नगरसेवक फिरोजखान पठाण, धनंजय चौधरी, शिवसेना शहर प्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, सुभद्राबाई बडगे, मुराद तडवी उपस्थित होते.

jalgaon 11 jpg webp

यावेळी एकूण 10 प्रभागातील 20 जागा पैकी 10 जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक 4 अ हा अनुसूचित जाती साठी राखीव, तर 5 अ अनुसूचीतजाती महीला राखीव, त्याच प्रमाणे 7 अ हा अनुसूचीत जमाती या प्रमाणे राखीव झाले तसेच उर्वरित प्रभागात 2 जागा पैकी 1 सर्वसाधारण महीला राखीव व 1 खुला प्रवर्ग ( सर्वसाधारण ) असे आरक्षण निघाले.

---Advertisement---

प्रभाग नुसार आरक्षण खालील प्रमाणे
सावदा न.पा. आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक 1 अ सर्वसाधारण महीला, 1 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ सर्वसाधारण महिला, 2 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महीला, 3 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 4 अ अनुसूचीतजाती , 4 ब सर्वसाधारण महीला, प्रभाग क्रमांक 5 अ अनुसूचीतजाती महीला, 5 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 अ सर्वसाधारण महीला, 6 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 अ अनुसूचीत जमाती, 7 ब सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 अ सर्वसाधारण महीला, 8 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अ सर्वसाधारण महीला, 9 ब सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अ सर्वसाधारण महीला, 10 ब सर्वसाधारण याप्रमाणे या प्रभाग आरक्षणआता तयार झाले असून यावर हरकती व सूचना साठी दि 15जून ते दि 21 जून दुपारी 3 वाजे पर्यंत मुदत असून कोणतीही हरकत न आल्यास सावदा पालिकेसाठी याप्रमाणे प्रभाग आरक्षण राहणार आहे,

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---